वैयक्तिक शेततळ्याकरिता अर्ज केला का ? बँक खात्यावर अनुदान लहरी पावसावर अवलंबून राहून शेती करणाऱ्याा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही दुबार पीक घेण्याची नामी संधी सरकारच्या शेततळे योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. शेततळे खोदकामास भरीव आर्थिक तरतूद असणाऱ्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा विस्तार करून सरकारने विविध आकारमानाच्या शेततळ्यांसाठी कमाल ७५ हजार रकमेच्या मर्यादित २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून महाडीबीटी प्रणालीद्वारे , ऑनलाइन सोडतीद्वारे लाभार्थीची निवड करून योजना अंमलबजावणीस सुरुवात केली आहे . पात्रतेसाठी निकष ? बँक खात्यावर अनुदान – शेतकऱ्यांच्या नावे असलेला ७/१२ , ८ अ (किमान ०.२० हे क्षेत्र असावे) , आधार कार्ड , आधार लिंक बँक पासबुक छायांकित प्रत , सामाईक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी इतर खातेदारांचे सहमती पत्र सादर करणे आवश्यक आहे. हमीपत्र , जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावीत. https://mahadbtmahait.gov.in येथे अर्ज करावा . ...
Comments
Post a Comment