RECENT POST

मागेल त्याला शेततळे योजना

 


      वैयक्तिक शेततळ्याकरिता अर्ज केला का? बँक खात्यावर अनुदान

  1. लहरी पावसावर अवलंबून राहून शेती करणाऱ्याा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही दुबार पीक घेण्याची नामी संधी सरकारच्या शेततळे योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. शेततळे खोदकामास भरीव आर्थिक तरतूद असणाऱ्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा विस्तार करून सरकारने विविध आकारमानाच्या शेततळ्यांसाठी कमाल ७५ हजार रकमेच्या मर्यादित २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून महाडीबीटी प्रणालीद्वारे, ऑनलाइन सोडतीद्वारे लाभार्थीची निवड करून योजना अंमलबजावणीस सुरुवात केली आहे.
  2. पात्रतेसाठी निकष ? बँक खात्यावर अनुदान 

  3.  शेतकऱ्यांच्या नावे असलेला ७/१२, ८ अ (किमान ०.२० हे क्षेत्र असावे), आधार कार्ड, आधार लिंक बँक पासबुक छायांकित प्रत, सामाईक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी इतर खातेदारांचे सहमती पत्र सादर करणे आवश्यक आहे. हमीपत्र, जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावीत. https://mahadbtmahait.gov.in येथे अर्ज करावा.

  4.     शेतकऱ्याने निवड केलेल्या आकारमानाचे अनुदान
  5.  शेततळे खोदकामाचे कामकाज पूर्ण केल्यावर प्रत्यक्ष मोजमापाद्वारे व मंजूर मापदंडाप्रमाणे अनुज्ञेय असलेले अनुदान संबंधित शेतकऱ्याच्या आधार क्रमांकास संलग्न असलेल्या बँक खात्यावर पीएफएमएस प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येईल.
  6. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याकरिता एकच अर्ज या तत्त्वावर मुख्यमंत्री शास्वत सिंचन योजनेंतर्गत शेततळे ही योजना महाडीबीटी प्रणालीद्वारे राबवून योजना अंमलबजावणीतील पारदर्शकता सुनिश्चित केली आहे.
  7. या योजनेचा विस्तार करून अनुदानात वाढ केल्यामुळे शेततळे खोदकामासाठी येणारा खर्च करणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.
  8. या योजनेचा लाभ घेतल्यास जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली येईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळे घेण्यासाठी अर्ज सादर करावेत.

        मागेल त्याला शेततळे योजनेची सविस्तर माहिती येथे वाचा

  • या योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येईल, या मध्ये जास्तीत जास्त 30 x 30 x 3 मीटर या आकारमानाचे व कमीतकमी इनलेट आणि आउटलेटसह प्रकारामध्ये किमान 15 x 15 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल आणि तसेच इनलेट आउटलेट विरहित प्रकारामध्ये किमान 20 x 15 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल, मागेल त्याला शेततळे योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा शासनाचा निर्णय आहे.
  • या योजनेंतर्गत 30 x 30 x 3 मीटर शेततळ्यासाठी 50,000/- रुपये इतके कमाल अनुदान निश्चित करण्यात आले आहे, इतर शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान देय राहील.
  • या योजनेमध्ये जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांना गट करून सामुदाईकरित्या शेततळ्याची मागणी करता येईल या शेततळ्याचे आकारमान शासनाच्या नियमाप्रमाणे लागू असलेल्या आकारमानानुसार राहील.
  • तसेच त्यांना मिळणारे अनुदान व पाण्याचा वापार, पाण्याची हिस्सेवारी याबाबत सबंधित शेतकऱ्यांनी 100 रुपयांच्या स्टँम्प पेपरवर करार करावा आणि तो अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील.

·          

  • या योजनेंतर्गत कृषी विभागाचे सहाय्यक किंवा कृषी सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे बांधणे बंधनकारक राहील
  • शेततळे तयार करण्याचा आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील
  • लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतःच राष्ट्रीय बँक किंवा इतर बँकमधील खाते क्रमांक सबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे पासबुकच्या झेरॉक्ससह सादर करावा
  • शेततळ्याच्या कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही
  • शेततळ्याच्या बांधावर आणि पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी
  • शेततळ्याच्या दुरस्तीची आणि निगा राखण्याची जवाबदारी संबधित शेतकऱ्यांची राहील, पावसाळ्यात शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था शेतकऱ्यांनी स्वतः करावी
  • लाभार्थी शेतकऱ्याच्या 7/12 उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक आहे
  • शासनाच्या नियमाप्रमाणे मंजूर शेततळे तयार करणे बंधनकारक राहील, तसेच शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्याने स्वखर्चाने लावणे बंधनकारक आहे
  • इनलेट आउटलेटची सोय असावी आणि शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणाचा खर्च स्वतः लाभार्थ्याने करावा 

                     मागेल त्याला शेततळे योजना 2023 आवश्यक कागदपत्रे

  • या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करावी लागतील
  • जमिनीचा 7/12 उतारा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला
  • दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला
  • आधारकार्ड
  • अ प्रमाणपत्र
  • स्वतःच्या स्वाक्षरी सहित भरलेला ar 

  • https://vaishnaviinfotec.blogspot.com/2023/04/maha-govt-shettale-yojna.html

      https://mahadbtmahait.gov.in

CLICH HERE.........


                                                        https://mahadbtmahait.gov.in  



https://vaishnaviinfotec.blogspot.com/2023/04/maha-govt-shettale-yojna.htm

Comments

Popular posts from this blog

Robotics and Artificial Intelligence

सोलर रूफटॉप योजना